पान-तंबाखूने रंगलेल्या भिंती जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या स्वच्छ

अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आता पुन्हा चर्चेत आलेत ते त्यांच्या नव्या 'गांधीगिरी'मुळे!

Updated: Sep 4, 2018, 08:07 PM IST
पान-तंबाखूने रंगलेल्या भिंती जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या स्वच्छ

अकोला : चांगल्या कामांसाठी सतत चर्चेत राहणारे अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आता पुन्हा चर्चेत आलेत ते त्यांच्या नव्या 'गांधीगिरी'मुळे! जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सोमवारी अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिलीय. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयातील भिंती पान आणि खऱ्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसल्या. मग काय, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: बकेट आणि पाणी घेऊन भिंती स्वच्छ करायला सुरुवात केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं. स्वतः जिल्हाधिकारी अस्वच्छ भिंती हातानं साफ करत असल्यानं खजिल होण्याची वेळ त्यांच्यावर आली.