राज्याच्या या जिल्ह्यात संसर्गदर अधिक; तर कोरोनाबाधित लहान मुलांच्या संख्येत वाढ

आठ जिल्ह्यांत संसर्गदर राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहेय. 

Updated: Sep 9, 2021, 08:27 AM IST
राज्याच्या या जिल्ह्यात संसर्गदर अधिक; तर कोरोनाबाधित लहान मुलांच्या संख्येत वाढ title=

मुंबई : राज्यात कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. कोरोना रूग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात असली तरीही आठ जिल्ह्यांत संसर्गदर राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहेय. या ठिकाणी एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्ण पाच जिल्ह्यांत आहेत. 

या कोरोनास्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यात 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या आठवडाभरात 41,425 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी मुंबई, पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्य़ांमध्ये 28,373 रुग्ण आढळले आहेत. 

तर दुसरीकडे राज्यात कोरोनाबाधित झालेल्या मुलांच्या संख्येत महिन्याभरात 4 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे. आकडेवारी पाहिली तर जुलैपर्यंत 10 वर्षांखालील 2 लाख 18 तर 11 वर्षांवरील 4 लाख 63 हजार बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. 11 वर्षांवरील मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण अधिक आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. 6 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, 10 वर्षांखालील 6738 लहान मुलांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या बालकांच्या संख्येत 3.36 टक्क्यांनी वाढ झाली. तर 11 वर्षांवरील वयोगटात 18 हजार 413 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. गेल्या महिनाभरात एकूण 25,151 मुलांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे.