Sangli Crime News : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात धडसी दरोडा पडला होता. हा दरोडा टाकणाऱ्या मास्टरमाईंडला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने बिहारच्या तुरुंगात बसून महाराष्ट्रात दरोडा टाकला होता. या आरोपीचा कारनामा पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. कारण व्हिडिओ कॉलच्या मदतीने हा दरोडा टाकण्यात आला आहे.
सांगलीतील रिलायन्स ज्वेलस दरोड्या प्रकरणी मुख्य सूत्रधारास बिहारच्या पटणा तुरुंगातुन अटक करण्यात आली आहे. सुबोधसिंग ईश्वर प्रसाद सिंग,असे या संशयिताचे नाव आहे. सुबोधसिंग बिहारच्या तुरंगात होता. सहा महिन्यांपूर्वी सांगली शहरातल्या रिलायन्स ज्वेल्स या सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा टाकून तब्बल सहा कोटी 44 लाखांचे दागिने भर दिवसात दरोडा टाकून लुटण्यात आले होते.
सिने स्टाईलने टाकण्यात आलेल्या या दरोड्या मध्ये कोणत्याही ठोस पुरावा नसल्याने आरोपींचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठा आव्हान होतं. याप्रकरणी तांत्रिक पद्धतीने तपास करत एका आरोपीला या आधी अटक करण्यात आली होती. आता या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या सुबोधसिंग ईश्वरप्रसाद सिंह याला अटक करण्यात आली आहे. पटनाच्या बिउर तुरुंगातून त्याने मोबाईलवरून फेसबुक आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ही चोरी घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.
या आरोपीवर विविध ठिकाणी 32 गुन्हे दाखल असून.तसेच जेलमधून तो टोळी चालवत असल्याचे तपासात समोर आले होते.
संशयित सुबोधसिंग यास शनिवारी रात्री सांगलीत आणण्यात आले असून त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.या चौकशीमध्ये आणखीन आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत केले जाईल असा विश्वास सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्सचे मालक विजय मेहता यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या युवराज घोरके याला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्स जवळ घोरके याने मेहता यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलं नसून पुणे पोलिसांनी इंस्टाग्राम वरून आरोपीचा शोध लावला आहे .त्या हल्ल्याचे सीसीटीव्ही सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत.आरोपीची आई मेहताच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची. काही दिवसांपूर्वी मेहताच्या घरी चोरी झाली होती. तेव्हा मेहताने तिच्यावर संशय घेत पोलीस स्टेशनला नेले होते..त्याच रागातून हा प्रकार झाला असल्याचे समजते.. लष्कर पोलीस पुढील तपास करत आहेत.
IND
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
ENG
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
England beat India by 5 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
SAM-W
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
PNG-W
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.