कोल्हापुरात होणार राज्यातील सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक; हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे. जाणून घेवूया कोण आहे निवडणुकीच्या आखाड्यात.

Updated: Apr 14, 2024, 11:48 PM IST
 कोल्हापुरात होणार राज्यातील सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक;  हातकणंगले लोकसभा मतदारसंघात  बहुरंगी लढत title=

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राज्यातील सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक होणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इथली बहुरंगी लढत.  पंचनामा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा. जाणून घेवूया कशी असेल येथील लढत. 

हातकणंगले.... श्री जोतिबाचं पवित्र देवस्थान... नृसिंहवाडीचं श्री दत्त देवस्थान... खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर... बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्य आणि पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले पन्हाळा... महाराष्ट्राची मँचेस्टर सिटी अशी ओळख असलेलं इचलकरंजी शहर... वारणा उद्योगसमुह याच मतदारसंघातला... ऊस हे इथलं प्रमुख पीक.. सर्वाधिक साखर कारखाने असलेला मतदारसंघ... इथल्या समस्यांचं स्वरूपही वेगळं...

इचलकरंजी वगळता इतरठिकाणी नोक-यांची संधी नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. ऊस उत्पादक शेतक-यांच्या समस्यांना कुणी वाली नाही ऊसाचा दर हा इथला कळीचा मुद्दा.. निवडणूक प्रचारातही हाच मुद्दा गाजतोय. पूर्वी या मतदारसंघाचं नाव इचलकरंजी होतं... २००९ च्या पुनर्रचनेनंतर तो हातकणंगले म्हणून ओळखला जाऊ लागला.

हातकणंगलेचं राजकीय गणित

2009 मध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या निवेदिता मानेंचा पराभव केला. 2014 मध्ये राजू शेट्टींनी दुस-यांदा खासदार होताना काँग्रेसच्या कलप्पा आवाडेंना हरवलं. मात्र, 2019 मध्ये मोदी लाटेचा फायदा घेत शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींसारख्या दिग्गजाला पराभवाचं पाणी पाजलं. विधानसभेचा विचार केला तर राष्ट्रवादीचे 2, अपक्ष 2, काँग्रेसचा 1 आणि जन सुराज्य शक्तीचा 1 आमदार आहे. 

शिवसेना शिंदे गट यावेळी विद्यमान खासदार धैर्यशील मानेंचा पत्ता कापणार, अशी चर्चा होती. मात्र महायुतीकडून त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. तर महाविकास आघाडी माजी खासदार राजू शेट्टींना पाठिंबा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटानं सत्यजित आबा पाटलांची उमेदवारी जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीनं डी. सी. पाटलांना मैदानात उतरवलंय.. तर भाजप समर्थक अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंनीही बंडाचा झेंडा हाती घेत ताराराणी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय... त्यामुळं इथं आता चक्क पंचरंगी लढत रंगणाराय.

प्रकाश आवाडेंच्या उमेदवारीमुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. त्यांची उमेदवारी हा भाजपचा राजकीय प्लॅन आहे का अशी चर्चा सुरू झालीय. तीन जैन आणि दोन मराठा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. एकाहून एक मातब्बर उमेदवार हातकणंगलेच्या आखाड्यात एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. त्यामुळं खासदार निवडताना मतदारांची कसोटी