नांदेड : भरदिवसा घरात घुसून एका इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेची हत्या करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे ही धक्कादायक घटना घडली. किनवट गोकुंदामधील शिवनगर भागात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आहे. सुरेखा राठोड या या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या.
अज्ञात व्यक्तीनं घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. हल्ला करुन अज्ञात मारेकरी पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या सुरेखा राठोड यांचा जागीच मृत्यु झाला. शेजारच्यानी ही माहिती पोलिसांना दिली. या खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. भरादिवसा हा खून झाल्यानं किनवट शहरात खळबळ उडालीय.