शाळा सुरू करण्याबाबत पालकांचा सरकारला हा सवाल; मुलांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील पालकांनी मोठी मागणी केली

Updated: Nov 21, 2021, 08:24 AM IST
शाळा सुरू करण्याबाबत पालकांचा सरकारला हा सवाल; मुलांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर title=

मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग कमी झाला असून जवळपास सर्वच गोष्टी सुरू झाल्या आहेत. शैक्षणिक संस्था देखील पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. पाचवीपासून पुढील वर्गांच्या शाळा - महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील पालकांनी मोठी मागणी केली असून ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. 

कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्यातील पाचवीपासून पुढील शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु पाचवीपेक्षा कमी इयत्तेच्या विद्यार्थ्यासाठी अद्याप शाळेत उपस्थितीची परवानगी देण्यात आलेली नाही.

पहिली ते चौथीचे वर्गही लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी पालकांच्या एका गटाने केली आहे. पालकांच्या गटाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केलीय. 

मॉल, सिनेमागृहात मुलं जाऊ शकतात, पार्टीलाही जाऊ शकतात तर शाळा सुरू करण्यात काय हरकत आहे असा सवाल पालकांनी केलाय.

1800 हून अधिक पालकानी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. सध्या लहान मुलांच्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे.