नाशिक : शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असून अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांसामोर नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
केंद्रीय अधिकाऱ्यांच्या गटासोबत शरद पवार यांनी नाशिकमधील अँग्रो फार्म कंपनीला भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिशादर्शक असा प्रकल्प नाशिकमध्ये सुरु झाला असून प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून आंबा, पेरू, डाळिंब ज्यूस, टोमॅटो सॉससारखे १५५ प्रकारचे प्रोडक्ट बनविले जातात. नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय समितीने या संपूर्ण प्रोसेसिंग युनिट बरोबर आगळ्यावेगळ्या अशा अॅग्रो मॉलला भेट दिली.
केंद्रीय कृषी मंत्र्यांना कळणार का नाशिकच्या बळीराजाच्या समस्या?
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांच्या गटासोबत शरद पवार यांनी नाशिकमधील अँग्रो फार्म कंपनीला भेट दिली खरी. मात्र, केंद्रीय कॄषि मंत्री राधा मोहन सिंग यांच्यापर्यंत नाशिकच्या शेतकऱ्यांच्या समस्या पोहोचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण,राधा मोहन सिंग हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शनि-शिंगणापुर इथं जाऊन शनिचं दर्शन घेत अभिषेकही केला. त्यानंतर पहाटे राधामोहन यांनी साईबाबांची काकड़ आरतीही केली.
साई समाधी दर्शना नंतर साई संस्थानच्यावतीनं केंद्रीय कृषि मंत्री राधा मोहन सिंग यांना शाल श्रीफळ आणि साईची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आलं.