महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; छगन भुजबळ यांना मोठी ऑफर?

Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सध्या सत्ताधा-यांची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आहे. दोघांना पर्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे नव्या आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचे चित्र आहेत.. 

वनिता कांबळे | Updated: Aug 27, 2024, 09:52 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; छगन भुजबळ यांना मोठी ऑफर?   title=

Prakash Ambedkar Chhagan Bhujbal Alliance : प्रकाश आंबेडकरांचं राजकारण  'सोशल इंजिनिअरींग'साठी ओळखलं जातं. राज्यातील तिसरी राजकीय शक्ती म्हणून उदयाला येण्याचं त्यांचं स्वप्नं 'भारिप'च्या नावानं पुर्ण होऊ शकलं नाही. म्हणूनच 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी 'वंचित बहुजन आघाडी' या नावानं स्वत:चं राजकारण व्यापक करण्याचा प्रयत्न केला. दलित, बहुजन समाजासह अठरापगड जातींना वंचितच्या छताखाली एकत्र आणण्याचं आंबेडकरांचं स्वप्नं होतं. मात्र, त्यांचं हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही..

2024 च्या लोकसभेला त्यांनी मराठा समाजाला जवळ करत मनोज जरांगे यांच्यासोबत सामाजिक युती केल्याचं जाहीर केलं होतं.. मात्र, मनोज जरांगेंनी लोकसभेत ऐनवेळी हात मागे घेतल्यानं फायदा झाला नसल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय.. प्रकाश आंबेडकरांचं राजकारण  'सोशल इंजिनिअरींग'साठी ओळखलं जातं. राज्यातील तिसरी राजकीय शक्ती म्हणून उदयाला येण्याचं त्यांचं स्वप्नं 'भारिप'च्या नावानं पुर्ण होऊ शकलं नाही. म्हणूनच 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी 'वंचित बहुजन आघाडी' या नावानं स्वत:चं राजकारण व्यापक करण्याचा प्रयत्न केला. दलित, बहुजन समाजासह अठरापगड जातींना वंचितच्या छताखाली एकत्र आणण्याचं आंबेडकरांचं स्वप्नं होतं. मात्र, त्यांचं हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही..

2024 च्या लोकसभेला त्यांनी मराठा समाजाला जवळ करत मनोज जरांगे यांच्यासोबत सामाजिक युती केल्याचं जाहीर केलं होतं.. मात्र, मनोज जरांगेंनी लोकसभेत ऐनवेळी हात मागे घेतल्यानं फायदा झाला नसल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय.. आरक्षण बचाव यात्रेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेला राज्यात नवी आघाडी करण्याच्या तयारी दर्शवली.. येत्या सप्टेंबर महिन्यात नागपुरात जाहीर सभा घेऊन आंबेडकर हे नव्या आघाडीची घोषणा करण्याची शक्यता आहे..

प्रकाश आंबेडकर यांनी नवी आघाडी करणार असल्याचे संकेत देत या नव्या आघाडीत सोबत येण्यासाठी आंबेडकरांनी छगन भुजबळ यांना जाहीर ऑफर दिली, तर माकप नेते माजी आमदार जे पी गावित यांची भेट घेत त्यांनाही साद घातलीय.. प्रकाश आंबेडकर यांच्या या ऑफरमुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागलं.. आंबेडकरांच्या नव्या आघाडीमध्ये कोण कोण सहभागी होत यावरून महाराष्ट्राचं राजकीय समीकरण आगामी काळात बदलणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.