महागाईचा भडका; शेतकऱ्याच्या 100 क्विंटल कांद्यावर चोरट्यांचा डल्ला

 Onion News : महागाईमुळे आता चोरट्यांनी आपल्या मोर्चा शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या मालावर वळवला आहे.  

Updated: Oct 12, 2021, 09:44 AM IST
महागाईचा भडका; शेतकऱ्याच्या 100 क्विंटल कांद्यावर चोरट्यांचा डल्ला title=
संग्रहित छाया

धुळे : Onion News : सध्या महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. खाद्य तेल आणि गॅस सिलिंडदरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पुरता हैराण झाला आहे. कांद्याचे (Onion) दरही वाढत आहेत. महागाईमुळे आता चोरट्यांनी आपल्या मोर्चा शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या मालावर वळवला आहे. धुळे येथे शेतकऱ्याने साठवलेल्या कांद्यावर चोरट्यांचा डल्ला मारला आहे. एका रात्रीत तब्बल 100 क्विंटल कांद्याची चोरी केली आहे. (Theft of 100 quintals of onion in Dhule)

जिल्ह्यातील कुसुंबा गावातील घटनेने कांदा चोरीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुसुंबा गावात एका शेतकऱ्याने साठवलेल्या 100क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कांदा चाळीवर हा डल्ला मारला आहे. त्यामुळे हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सुभाष शिंदे यांनी आपल्या शेतातील चाळीत दीडशे क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. भाव मिळेल या आशेत ते होते. यातील 15 क्विंटल कांदा त्यांनी मागच्या महिन्यात विकला. मात्र रात्री अचानक चोरट्यांनी चाळीतील 100 क्विंटल कांदा चोरला. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.