चोरीसाठी गेलेला चोर दुकानातच अडकला...

इंदिरानगर येथील मुख्य रस्त्यावरील बापू बंगला चौकातील स्टेशनरीचे दुकान चोरट्यांनी फोडले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 15, 2017, 10:13 AM IST
चोरीसाठी गेलेला चोर दुकानातच अडकला...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

इंदिरानगर : इंदिरानगर येथील मुख्य रस्त्यावरील बापू बंगला चौकातील स्टेशनरीचे दुकान चोरट्यांनी फोडले. चोरी करताना त्यातील एकजण दुकानातच अडकला तर  दुसरा फरार झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बापू बंगला परिसरात श्री विद्यालक्ष्मी स्टेशनर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात बुधवारी रात्री चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, यातील एक चोर या दुकानातच अडकला. त्याला बाहेर येताच आले नाही. सकाळी नागरिकांची वर्दळ सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी तातडीने दुकानमालकासह पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना दुकानात एक जण असल्याचे आढळून आले. दुकानातील सुमारे तीन हजार रुपयांचा माल लंपास झाल्याचे समजते.

दिरानगरमधील वडाळा-पाथर्डी या मुख्य रस्त्यावर चौकातील दुकान फोडण्यात येत असतानाही पोलिस कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे दिसून आले आहे. इंदिरानगर परिसरात पोलिसांचा दरारा कमी झाल्याने अशा पद्धतीने सर्रासपणे चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे मानले जात आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.  इंदिरानगरमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.