सोलापूर - पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेला अपघात, तीन जण ठार

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune - Solapur highway) रुग्णवाहिकेला (Ambulance Accident) मोहोळ येथे भीषण अपघात (Solapur Accident) झाला.  

Updated: Nov 14, 2020, 10:05 AM IST
सोलापूर - पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेला अपघात, तीन जण ठार  title=

सोलापूर : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune - Solapur highway) रुग्णवाहिकेला (Ambulance Accident) मोहोळ येथे भीषण अपघात (Solapur Accident) झाला. या अपघातात रुग्णवाहिकेमधील तीन जण जागीच ठार झालेत. एका मृतदेहाला घेऊन जात असताना हा अपघात झाला. पुण्यावरुन हैदराबादकडे जात असताना मालवाहतूक ट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागून जोरदार धडक दिली.

मोहोळ शहरातील कन्या प्रशालेसमोर हा अपघात झाला. रुग्णवाहिकेत १७ जण होते. या अपघात चालकासह तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे ३.४५ ते ४ वाजण्याच्या दरम्यान झाला. रुग्णवाहिकेने धावत्या ट्रकला धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा झाला आहे. जखमींना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णवाहिकेतून एक कुटुंब नातेवाईकाचा मृतदेह गावी घेऊन चालले होते. मात्र, काळाने त्यांच्यावरच घाला घातला.

 बस नदीत कोसळली

तर सातारा येथील दुसऱ्या एका अपघातत पाच जण ठार झाले आहेत. पुणे-बंगलोर महामार्गावर साताऱ्यात मिनी बस नदीत कोसळली. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर सात जण जखमी झालेत. मृतांमध्ये एक महिला आणि तीन वर्षांच्या मुलाचा समावेष आहे. मिनी बसमधलं कुटुंब गोव्याला फिरायला जात असताना हा अपघात झाला. उंब्रज जवळच्या तारळी नदीत ही बस कोसळली. 

दिवाळीला गालबोट

गोंदियात दिवाळीला गालबोट लागले आहे. गोंदिया पोलीस दलाच्यावतीने दिवाळीचे औचित्त साधून आधीवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून येणाऱ्या पोलीस दलाच्या गाडीचा अपघात झाला. पाथराटोला गावाजवळ पोलिसांची खासगी वाहन अनियंत्रीत होऊन अपघात झाला. या अपघातात एका पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार पोलीस शिपाई जखमी झाले. जखमींवर गोंदिया शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.