चांदवड येथील घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात, तिघे जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात विचित्र अपघात झाला.  

Updated: Sep 3, 2019, 12:22 PM IST
चांदवड येथील घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात, तिघे जखमी title=

नाशिक : भरधाव वेगाने जाणारी पिकअप, ट्रक आणि गॅस टँकर यांच्यात विचित्र अपघात झाला. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात हा अपघात झाला. अपघातात गॅस टँकर उलटून त्यातून गॅस गळती सुरू झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली होती.

गॅस टॅंकरमधून वायू गळती झाल्याने टोल नाक्यावरील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी टँकरमधून होणाच्या गॅस गळतीवर नियंत्रण मिळविले. या अपघातात पिकअप आणि ट्रक मधील तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

गॅस टँकरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे या महार्गावरील वाहतून ठप्प झाली होती. रात्री उशिरा अपघाग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आली.