Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात दिवसभरात कोरोना रुग्णसंख्या वाढली की घटली?

राज्यातील कोरोना आकडेवारी समोर आली आहे.  

Updated: Jul 6, 2021, 09:14 PM IST
Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात दिवसभरात कोरोना रुग्णसंख्या वाढली की घटली?

मुंबई : राज्यातील कोरोना आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आज 6 जुलैला 5 जुलैच्या तुलनेत रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 8 हजार 418 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर आज दिवसभरात  10 हजार 548 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण  58 लाख 72 हजार  268 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा  96.06 टक्के इतका झालाय. कोरोनामुळे दिवसभरात  171 जणांना  जीव गमवावा लागला आहे.  त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा 2.02 इतका झाला आहे.  (today 6 july 2021 Maharashtra 8 thousand  418   new corona patients found) 

मुंबईची स्थिती

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा आता  500 च्या खाली आला आहे. मुंबईत 453 रुग्णांचं निदान झालंय. तर त्यापेक्षा अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज एकूण 482 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही आता 6 लाख 99 हजार 823 इतकी झालीये. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर हा (Recovery Rate)  96  टक्के इतका झालाय. मुंबईतील कोरोना दुप्पटीचा दर हा आता 822 दिवसांवर पोहचला आहे.