Gold Rate Today : आज मुहूर्त सोन्याचा! दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price : आजचा मुहूर्त सोने खरेदीचा आहे. कारण आज सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today News) घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवस सोन्याच्या दरात अस्थिरता होती. मात्र आज सोने खरेदीदारांना आनंदाची बातमी दिली.

श्वेता चव्हाण | Updated: May 19, 2023, 09:34 AM IST
Gold Rate Today : आज मुहूर्त सोन्याचा! दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर? title=
Today gold Silver Rate in Mumbai pune nagpur and nashik on 19th May 2023

Gold Silver Price Today 19 May : गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Today gold Silver Rate) चढ-उताप पाहायला मिळत आहे. आज सोने आणि चांदी दोन्हींचे भाव वधारले असून सोने आणि चांदी खरेदीसाठी आजचा चांगलाच मुहूर्त आहे. कारण 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज (19 मे 2023) 59,840 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत प्रति 10 ग्रॅम 60,290 रुपयांवर बंद झाली होती. सराफा बाजारात चांदी 72,130 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर मागील व्यवहारात चांदीचा भाव 72,660 रुपये प्रति किलो होता. 

तुमच्या शहरातील सोन्याचे दर

सराफा बाजाराच्या माहितीनुसार मुंबईत (Mumbai Gold Rate) 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,853 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,840 प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम पुण्यचा दर 54,853 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,840 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,853 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,840 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,853 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,840 रुपये आहे.  

वाचा : महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग, तुमच्या शहरांतील दर काय? 

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय फरक?

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळलेला नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. तर 22 कॅरेट सोने 91.67 टक्के शुद्ध सोने आहे. इतर 8.33 टक्के मध्ये इतर धातू आहेत. तसेच 21 कॅरेट सोने 87.5 टक्के शुद्ध सोने आहे. 18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने असते आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.5 टक्के शुद्ध सोने असते.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी अॅप बनवण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' या अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच यासंबंधी तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक कालबाह्य झाल्याचे आढळल्यास ग्राहक अॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ग्राहकाच्या तक्रारीची आणि व्यवहाराची माहिती तुमच्यामार्फत लगेच मिळेल.

999 असं 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 

916 असं 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर

875 असं 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 असं लिहीले असते.