नागपुरातील सुरेवानी बफरमध्ये पर्यटकांना अस्वल आणि 2 पिल्लांचे दर्शन

पावसाळ्या दरम्यान ताडोबा अभयारण्यातील कोर झोन पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र सूरेववानी बफर झोनची पावसाळ्यात सफारी सुरू आहे. या सफारीत वन्य प्राण्यांचे दर्शन ही पर्यटकांना होत आहे.

वनिता कांबळे | Updated: Jul 13, 2024, 07:10 PM IST
नागपुरातील सुरेवानी बफरमध्ये पर्यटकांना अस्वल आणि 2 पिल्लांचे दर्शन title=

Nagpur Pench Tiger Buffer Zone :  नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील सुरेवानी बफर झोनमध्ये वन्यजीव प्रेमीं आणि पर्यटकांना  अस्वल आणि तिच्या दोन पिल्लांचं दर्शन झालं. दोन पिल्लं आईसोबत जंगलात फिरत होते. पर्यटकांनी हे दृष्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्गा.रल झाला आहे.

लातिश हिंगे या वन्यजीव प्रेमींनी अस्वल आणि तिच्या दोन पिल्लांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. एक जुलै पासून पेंच कोरझोनमधील सफारी बंद झाली आहे. मात्र सूरेववानी बफर झोनची पावसाळ्यात सफारी सुरू आहे. या सफारीत वन्य प्राण्यांचे दर्शन ही पर्यटकांना होत आहे. याच दरम्यान अस्वल आणि तिचे दोन पिल्ले यांचा हा व्हिडिओ टिपण्यात आला आहे. 

ताडोबा अभयारण्यातील कोर झोन पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी बंद

पावसाळ्या दरम्यान ताडोबा अभयारण्यातील कोर झोन पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिलीय. दरम्यान बफर झोन मात्र पर्यटकांसाठी खुला राहणार आहे. पावसाळ्यामध्ये रस्ते खराब होत असल्यानं मोठी अडचण निर्माण होते. यामुळेच राष्ट्रीय व्याघ्र आरक्षित प्रशासनाकडून हे आदेश देण्यात आल्याची माहितीही वनाधिकाऱ्यांनी दिली. एक जुलैपासून हा कोर झोन बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र बफर झोनमध्ये पर्यटक सफारीचा आनंद लुटू शकणार आहेत. 

बफर झोनमध्ये फुलपाखरू उद्यान

चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफर आता आणखी आनंददायी होणार आहे. कारण बफर झोनमध्ये फुलपाखरू उद्यान साकारण्यात आलंय. पर्यटकांना समग्र वनसृष्टीची माहिती व्हावी आणि त्यातून वनवैभवाचं जतन करण्याची प्रेरणा मिळावी, हा यामागचा उद्देश आहे.