वाहतूक पोलिसांना तरुणांकडून धक्काबुक्की, दोघांना अटक

गाडी टो करण्याच्या वादातून दोन तरुणांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 2, 2017, 12:40 PM IST
वाहतूक पोलिसांना तरुणांकडून धक्काबुक्की, दोघांना अटक title=

उल्हासनगर : गाडी टो करण्याच्या वादातून दोन तरुणांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय. 

नो पार्किंगमधील गाड्यांवर कारवाई

उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातला हा सगळा प्रकार टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. उल्हासनगर स्टेशनच्या पूर्व भागात वाहतूक कोंडी झाल्यानं टोईंग व्हॅननं अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्या अनाऊन्समेंट करून उचलायला सुरुवात केली. 

गाडीला जॅमर लावताना शिवीगाळ

मात्र, यावेळी विशाल आढाव आणि गणेश लष्करे या दोन तरुणांनी त्यांची उचललेली गाडी जबरदस्तीनं ओढून खाली घेतली. यावेळी टोईंग व्हॅनवर उपस्थित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सुळ यांनी गाडीला जॅमर लावण्याचा प्रयत्न केला. 

दोघांवर गुन्हा दाखल

वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा राग आल्यानं या दोघांनी सुळ यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली. या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.