Raj Thackeray on Rahul Gandhi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचाच धागा पकडत राज ठाकरे यांनी राहुल गांधींवर खरमरीत टीका केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
आपण एकमेकांकडे जातीपातीने पाहायला लागलो आहोत. फक्त महापुरूषांची बदनामी करत आहोत, त्या दिवशी म्हैसूर सँडल सोप आला होता महाराष्ट्रात राहुल गांधी, गुळगुळीत मेंदूचं आहे. राहुल गांधी काय बोलतो हे समजत नाही, अरे गधड्या लायकी आहे का तुझी सावरकरांवर बोलायची, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
वीर सावरकरांनी दयेचा अर्ज केला होता म्हणे अरे पण त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. सर सलामत तो पगडी पचास, एखादी चांगली गोष्ट होण्यासाठी खोटं बोलावं लागलं तर खोटं बोला पण ती गोष्ट होणं महत्त्वाचं आहे. याला कृष्णनिती म्हणत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झराजे जयसिंगला दिलेल्या किल्ल्यांचं उदाहरण दिलं.
दरम्यान, त्यावेळी युद्ध करणं परवडणारं नव्हतं कारण तेव्हा मावळे थकलेले, आर्थिक अडचणी होत्या. परिस्थिती तशी होती म्हणून किल्ले दिले. परिस्थिती निवळल्यावर घेऊ की किल्ले याला स्ट्रॅटेजी म्हणत राज ठाकरेंनी गांधींना सुनावलं.