पुणे : आर्थिक संकटात असलेल्या पुण्याच्या सिंहगड महाविद्यालयाच्या दोन शाखा विक्रीला काढण्यात आल्या आहेत. सोलापुरातली दोन महाविद्यालये विक्रीला काढल्याची जाहिरात देण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सिंहगड संस्थेचे कर्ज न फेडल्याने महाविद्यालयवर बँकेने ताबा घेतला आहे. बँकेने आता ही दोन महाविद्यालये लिलावात काढण्याची तयारी सुरू केली आहे.
वर्षभरापासून संस्थेकडून शिक्षकांना पगार देण्यास उशिर होत होता. त्यानंतर आज दोन महाविद्यालये ताब्यात बँकेकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. संस्थेकडून कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेकडून महाविद्यालयांचा लिलाव करण्यात येत आहे. मात्र आता या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.