तुमच्यासाठी काय पण... एका मादीसाठी भिडले दोन नर जातीचे साप

एका मादीसाठी दोन सापांमध्ये तुफान झुंज झाली. सापाच्या झुंजीचा थरारा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Updated: Jun 25, 2023, 09:19 PM IST
तुमच्यासाठी काय पण... एका मादीसाठी भिडले दोन नर जातीचे साप title=

Snake Fight : आकर्षण हा मनुष्यच नाही तर प्रत्येत सजीवाचा मायनस पाईंट आहे. आवडत्या स्त्री वरुन पुरुषांमध्ये वाद झाल्याच्या घटना आपण नेहमीच पाहत असतो. मात्र, मनुष्यांप्रमाणेच अशी इर्षा सापांमध्ये देखील पहायाला मिळलाी आहे. भंडारा येथे एका मादीसाठी दोन नर जातीचे साप भिडले आहेत. सापाची झुंज कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील राहुल खोब्रागडे यांच्या घरी साप असल्याची माहिती सर्पमित्र आशिक नैताम यांना मिळाली. आशिक तात्काळ राहुल यांच्या घरी दाखल झाले. दोन कुकरी जातीचे साप त्यांना भांडत असल्याचे दिसले. एका मादी साठी दोन नर जातीच साप भांडण करत होते. सर्प मित्र आशिक नैताम यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात ही झूंज कैद केली. सापांची झुंज पाहण्यासाठी राहुल यांच्या घरी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.

सापांची प्रणयक्रीडा कॅम-यात कैद

हिंगोली जिल्ह्यात धामण सापांची प्रणयक्रीडा कॅम-यात चित्रित झाली झाली होती. सेनगाव तालुक्यातील घोरदडील्या लक्ष्मण ढोले यांच्या शेतात धामण सापाची प्रणयक्रीडा चित्रित करण्यात आली. तब्बल 8 फूट लांब असलेल्या धामण सापाची हे प्रणयाराधन असल्याचं सर्पमित्रांनी सांगितले. 

सापाची शिकार हरणाने केली

चपळ हरिण गवत खाताना त्याची शिकार वाघाकडून झाल्याचे अनेक व्हीडिओ आपण पाहिले. मात्र, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत चक्क एक हरिण साप खाताना दिसत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय,एका पर्यटकानं हा व्हीडिओ काढलाय,मात्र हा व्हीडिओ कुठला याबाबत माहिती मिळालेली नाही.

एका घरातून एक नव्हे. दोन नव्हे तर तब्बल 40 साप निघाले

एका घरातून एक नव्हे. दोन नव्हे तर तब्बल 40 साप निघाले होते.  गोंदिया शहरातल्या राजेश शर्मा यांच्या घरातून सापाची तब्बल 39 पिल्लं निघाली. हे घर जवळपास 20 वर्ष जुनं आहे. लाकडी दरवाज्याच्या फ्रेममध्ये वाळवी लागली होती. घरमालकाने वाळवी काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला आतमध्ये काही तरी काळ्या रंगाची वस्तू दिसून आली. आणखी खोदकाम केल्यावर सापाची पिल्लं ,सापडली. सर्प मित्र घटनास्थळी पोहोचले आणि 39 सापाची पिल्लं बाहेर काढली. या सगळ्या सापांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.  

एकाच ठिकाणी सापाची 25 हून अधिक पिल्लं

अमरावतीमध्ये एकाच ठिकाणी सापाची 25 हून अधिक पिल्लं आढळून आली होती. गुरुकुज मोझरीमध्ये एका घरातील तुळशी वृंदावनाखालून 2 पिल्लं बाहेर आली. अंगाणात खेळणाऱ्या मुलांनी ही पिल्लं पाहिली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावलं असता त्यानं बिळातून 25 पिल्ली बाहेर काढली. या पिल्लांना ताब्यात घेऊन त्यांना जंगलात सोडून दिले.