लोणावळा : लोणावळयामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपोवर पाणी साठवण्यासाठी खड्डा तयार करण्यात आला आहे. या २० ते २५ फूट खोल खड्ड्यात ही मुलं बुडाली. इम्रान उर्फ सोनू रफिक शेख आणि अस्लम इस्माईल मुजावर अशी त्यांची नावं आहेत. साधारण १५ ते १६ वर्षं वयोगटातली ही मुलं एकमेकांचे मावसभाऊ आहेत. सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. कचरा डेपोवर कचरा वेचक म्हणून ही दोन्ही मुलं काम करत होती. सकाळी कचरा डेपोमध्ये ते गेले असता पाय घसरून ते पाण्यात पडल्याचं सांगण्यात येतं आहे.