उद्धव ठाकरेंनी महाआघाडी तोडावी अन्यथा...सुब्रमण्यम स्वामींचा इशारा

माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांचा इशारा

Updated: May 20, 2020, 12:40 PM IST
उद्धव ठाकरेंनी महाआघाडी तोडावी अन्यथा...सुब्रमण्यम स्वामींचा इशारा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्ताच महाआघाडी तोडावी अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवून टाकतील असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. 

महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे असमर्थ आहेत. अशावेळी राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो असे ते म्हणाले. 

आता महाविकास आघाडीचे नेते यासर्वाला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.