... शेतकऱ्यांच्या असंतोषाचं नेतृत्व आम्ही करू - उदयनराजे

उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा 

Updated: Nov 2, 2019, 11:42 AM IST
... शेतकऱ्यांच्या असंतोषाचं नेतृत्व आम्ही करू - उदयनराजे  title=

मुंबई : ऑगस्ट महिन्यातील महापूर, दिवाळीनंतरही चक्रीवादळ, हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच भरपूर नुकसान झालं आहे. या सगळ्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मदत करा अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचं नेतृत्व आम्ही करू, असं भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. 

या संदर्भात उदयनराजे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली आहे. या मागणीची पूर्तता झाली नाही तर शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा उदयनराजेंनी दिली आहे. 

यासंदर्भात एक दिवसाचे  विशेष अधिवेशन बोलवा आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत करा अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे. नैसर्गिक संकटामुळे कोलमडलेल्‍या बळीराजाला शासनाने योग्‍य ती मदत देऊन धीर द्यावा असं निवेदन राज्यपालांना देण्यात आलं आहे. दहा वर्षांपासून करत असलेली विमा योजनेची अंमलबजावणी झाली असती तर शेतकऱ्यांना मदतीसाठी हात पसरावे लागले नसते,' असं देखील उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. “यावर्षी ऑगस्ट महिन्यात पूर आला. त्यात शेतकऱ्यांच्या साधनसंपत्तीचे नुकसान झाले होते. आता वादळ, चक्रीवादळ, हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली पिकं गेली आहेत.