Narayan Rane | आम्ही वेटिंगवर बसलोय, राज्याने केंद्र सरकारला सत्ता द्यावी : नारायण राणे

नारायण राणे (Narayan Rane), सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. 

Updated: Jul 25, 2021, 06:11 PM IST
Narayan Rane | आम्ही वेटिंगवर बसलोय, राज्याने केंद्र सरकारला सत्ता द्यावी :  नारायण राणे

चिपळूण : कोकणात उद्भलेल्या पूरपरिस्थितीचा आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आढावा घेतला. या तिन्ही नेत्यांनी चिपळूणमधील पूरस्थितीची पाहणी केली. यानंतर या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. नारायण राणेंनी पूरपरिस्थितीवरुन राज्य सरकार (Maharashatra Government) आणि प्रशासनावर ताशेरे ओढले. या दरम्यान राज्याने केंद्र सरकारला (Central Government) सत्ता द्यावी, असं वक्तव्य केलं, यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (Union Minister Narayan Rane said that the Maharashtra government should hand over power to the central government)

राणे काय बोलले? 

पत्रकारने केंद्र सरकारकडून चक्रीवादळासाठी येणारी मदत अजून आलेली नाही, असा प्रश्न विचारला. यावर राणेंनी उत्तर दिलं. "केंद्राने मदतीसंदर्भात काही बाकी ठेवलेलं नाही. पण राज्य कशाला आहे, असा प्रश्न यावेळेस उपस्थित केला. तसेच राज्याने केंद्राला सरकार चालवायला द्यावं. आम्ही इथं कधीपासून वेटिंगवर बसलोय", असं राणे म्हणाले. त्यामुळे एकच हशा पिकला. "केंद्र सातत्याने पैसे देतेय. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्राचं कौतुक केलं. मुख्यमंत्री आज विनम्र झाले" असंही राणे म्हणाले.  

राजकारण आम्ही करत नाही

राजकारण आम्ही करत नाही. राजकारण ज्याला येत नाही, त्याच्याशी आम्ही राजकारण करत नाहीत. आमच्या तोडीच्या लोकांसोबत राजकारण करतो, असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.