राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

Prakash Ambedkar on Raj Thackeray: राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाडा लावून अटक केलं पाहिजे असं विधान बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. सरकारने मागे पुढे न पाहता आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Aug 5, 2024, 06:29 PM IST
राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले? title=

Prakash Ambedkar on Raj Thackeray: राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाडा लावून अटक केलं पाहिजे असं विधान बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. सरकारने मागे पुढे न पाहता आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी परप्रांतीयांवरुन केलेल्या विधानावरुन प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलं आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेल्या विधानावरुन वाद पेटलेला असताना, आता प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामुळेही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"बाहेरच्या राज्यांमधून मुलं येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकावतात. आपल्या राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात. आपल्या मुला मुलींना मिळत नाही. ठाणे, पुणे, नागपुरात ज्याप्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रीज आणि इतर सगळ्या गोष्टी मूळच्या लोकसंख्येसाठी नाही तर बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी होतात. म्हणजे बाहेरुन येणाऱ्या लोकांचा लोंढा किती मोठ्या प्रमाणात आहे. येथे या शहरात आल्यानंतर त्यांची व्यवस्था करण्यात सरकारचा इतका पैसा खर्च होतो. राज्यात इतक्या गोष्टी उपलब्ध असताना महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रातील मुला मुलींना आधी प्राधान्य द्या आणि उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा असं मी आधीपासूनच सांगत आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

राज ठाकरेंना अटक करा - प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांना राज ठाकरेंच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "राज ठाकरेंवर टाडा, कोटा लागला पाहिजे. समाज दुंभगणारं हे विधान आहे. सरकारने मागे पुढे न पाहता अशांना सरळ आत टाकून मोकळं झालं पाहिजे".

आरक्षण बचाव यात्रेला प्रचंड मोठं यश मिळालं आहे असं सांगताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी हे राजकीय भांडण निवडणुकीपर्यंत कायम राहील असं मोठं विधान केलं. 

राजकीय पक्ष्याचे नेते महाराष्ट्र दंगलीच्या उंबरठ्यावर असतांना देखील सामाजिक प्रश्नावर भूमिका घेत नाहीत. हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे असं मी मानतो. राजकीय नेते किती कमकुवत आहे हे यातून स्पष्ट होत आहे. आपल्या समाजाच्या बाजूने आहे की नाही हे सांगण्याची हिंमत या नेत्यात नाही अशी खंत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलीय

विधानसभेनंतर विधानसभेच्या माध्यमातून ओबीसीची जनगणना झाली पाहिजे हे मान्य करून तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती होईल असे काही व्यक्ती लोकांना सांगत सुटले. काँग्रेसच्या लोकांना कणा नाही, त्यांना कणा असता तर ते झुकले नसते अशी टीका त्यांनी केली. जी सेनेची मतं आहेत ती शिंदेंकडे राहिली त्यामुळे एकनाथ शिंदेंची सेना हीच खरी शिवसेना मानतो. ठाकरे आणि शिंदे यांच्यात शिंदे यांचा स्ट्राइक रेट जास्त आहे असंही ते म्हणाले.