व्हाइस अॅडमिरल आवटी यांचे निधन

नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले व्हाइस अॅडमिरल मनोहर प्रल्हा आवटी यांचे निधन.

Updated: Nov 5, 2018, 01:05 PM IST
व्हाइस अॅडमिरल आवटी यांचे निधन title=

फलटण : नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले व्हाइस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद तथा एम. पी. आवटी यांचे निधन झालंय. फलटण इथं विंचुर्णी या मूळगावी वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हाइस अॅडमिरल आवटी यांनी नौदलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. 

आरमार इतिहासाविषयी प्रचंड जिव्हाळा असलेले अॅडमिरल आवटी हे मेरिटाइम हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक होते. शिडाच्या बोटीने जगप्रदक्षिणेला त्यांनी प्रोत्साहन दिले होते. आवटी यांच्या निधनाने नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होतेय.  फलटणजवळचं विंचुर्णी या आवटी यांच्या मूळगावी गावात अत्यंत साधेपणानं अत्ंत्ससंस्कार करण्यात आले.