Bhavana Gawli Oath Ceremony: नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये (Vidhan Parishad Election) जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा आज शपथविधी पार पडला. यावेळी घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय महाराष्ट्र, जय एकनाथ' अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान त्यांनीच शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यामागील कारणही सांगितलं.
शिवसेना फुटल्यानंतर भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळणार अशी चर्चा होती. मात्र भाजपने मात्र त्यांच्या नावाला विरोध करुन राजश्री पाटील यांना संधी दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी भावना गवळींना विधानपरिषदेत संधी दिली आणि त्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यामुळे शपथविधी पार पडला यावेळी त्यांनी संधी देणाऱ्या पक्ष प्रमुखांचे देखील नाव घेतले.
"नाथांचे नाथ म्हणून आपण स्मरण करतोच. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच मी आज सभागृहात पोहोचली आहे. अनेक समाजकार्य, राजकारण केल्यानंतर मी सभागृहात पुन्हा एकदा परतली आहे. दिल्लीतून मुंबईत येण्याची संधी प्रथमच मिळत आहे," असं भावना गवळी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.