विनायक मेटे प्रकरणाला आता वेगळं वळण, पुतण्या आणि भाच्याकडून खळबळजनक आरोप

माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनानंतर आता त्यांच्या अपघाताबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Updated: Aug 17, 2022, 04:09 PM IST
विनायक मेटे प्रकरणाला आता वेगळं वळण, पुतण्या आणि भाच्याकडून खळबळजनक आरोप title=

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete death case) यांचा पुतण्या आणि भाचा यांनी आता नवीन आरोप केले आहेत. विनायक मेटे (Vinayak mete car accident) यांचं कार अपघातात निधन झालं होतं. या प्रकरणाची सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण आता यात आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. 

बाळासाहेब चव्हाण हे विनायक मेटे यांचा भाचे आहेत. त्यांनी बोलताना ड्राईव्हरवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, 'या दुःखातून आम्ही सावरलो नाही मात्र 3 दिवसानंतर आम्ही मीडिया समोर यायचे ठरवले. हा घातपात का अपघात हे निष्पन्न झाले नाही. ड्रायव्हर वेग वेगळे स्टेटमेंट देतो आहे. अपघात झाल्यानंतर मला फोन आले. '

'साहेबांचे 3 ड्रायव्हर आहेत. मला माहित नव्हतं कोण ड्रायव्हर आहेत ते. एकनाथ कदम हा ड्रायव्हर आहे असे कळले तर मी त्याला मी फोन केला. मी त्याला त्यांचं लोकेशन विचारलं. रोज फिरणारा ड्रायव्हर मला विचारात होता की तुम्ही कोण बोलत आहे. मी त्याला लोकेशन सांग असे सातत्याने विचारत होतो पण तो नुसता रडत होता. एका तिरहाईत व्यक्तीला त्याने फोन दिला आणि त्यांनी मला सांगितले की तिथे अँब्युलन्स आली आहे. 

'त्या व्यक्तीने मला सांगितले की ड्रायव्हरला काही झाले नाही. पोलीस जखमी आहेत पण साहेब जागेवर गेले आहेत. साहेबांच्या पायाला, डोक्याला लागलं आहे असे ड्रायव्हरने मला सांगितले. हा ड्रायव्हर रोज सातत्याने स्टेटमेंट बदलत चालला आहे. याला घात का अपघात म्हणायचे.'

'सरकारने समिती नेमली पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. हा घात आहे का अपघात हे आम्हाला कळायला हवे. आम्ही या दुःखातून सावरलो नाही. सर्व चुकी ड्रायव्हर एकनाथ कदम यांची आहे. सीसीटीव्ही मध्ये आम्हाला कुठेच दिसली नाहीत. हा ड्रायव्हर सतत कोणाला फोन करत होता. ड्रायव्हरचा संपर्क कोणाशी होता त्याचे कॉल डिटेल्स हवेत. त्याने लोकेशन का नाही सांगितले त्याला नेमका काय प्रोब्लेम होता.' असा आरोप देखील त्यांनी केला आहे.