महाविकासआघाडी सरकारकडून वारकऱ्यांना मोठे गिफ्ट

महाविकासआघाडीचे ( Mahavikas Aghadi government) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या सरकारने राज्यातील वारकऱ्यांना एक चांगली बातमी दिली आहे.  

Updated: Sep 11, 2021, 07:04 AM IST
महाविकासआघाडी सरकारकडून वारकऱ्यांना मोठे गिफ्ट title=

शशिकांत पाटील / लातूर : महाविकासआघाडीचे ( Mahavikas Aghadi government) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या सरकारने राज्यातील वारकऱ्यांना एक चांगली बातमी दिली आहे. आता वारकऱ्यांना (Warkari) मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती  सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली.

महाविकासआघाडी सरकारकडून वारकऱ्यांना मोठे गिफ्ट

राज्यातील लोककलावंतांसह आता वारकऱ्यांनाही राज्य सरकार मानधन देणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी 'झी २४ तास'ला दिली आहे. काही दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या वारकरी परिषदेत ही मागणी करण्यात आली होती. या मागणीला मुख्यमंत्र्यांनीही तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती देशमुख यांनी येथे दिली. 

कोरोना काळात वारकरी संप्रदायातील कलावंत, लोककलावंत, गायक-वादक राज्यातील अनेक कलावंत, लोककलावंत, बँडबाजा पथक यांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे त्यांना काही अंशी का होईना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ही मदत देण्याचे ठरविले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यांची छाननी करून ती नावे शासनाकडे आल्यानंतरच ही मदत दिली जाणार असल्याचेही अमित देशमुख यांनी 'झी २४ तास'शी बोलताना स्पष्ट केले आहे.