कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नाले, गटार सफाईची पहिल्याच पावसात पोलखोल झालीय.
कालपासून जोरदार पडलेल्या पावसाने कल्याण पूर्वमधील अनेक चाळी आणि बैठ्या घरांमध्ये पाणी शिरलं. त्याचप्रमाणे पूर्वेतील सर्वच प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले होते. सुदैवाने दुपारनंतर पावसाची उघडीप झाल्याने पाणी ओसरलं. दरम्यान कल्याण पुर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी महानगरपालिकेवर टीकेची झोड उठवलीय.
पहिल्याच मोठ्या पावसात महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली असल्याचा त्यांनी आरोप केला. पावसाळा सुरू होण्याच्या दहा दिवस आधी नालेसफाईचे टेंडर काढलं जातं आणि केवळ दिखावा केला जातो. यामागे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. तर ज्या घरात पाणी घुसलं त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.