किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) अचानक केवढे कष्ट घेत आहेत, उलट त्यांना मदत करायला तयार आहोत, असे आज्ञा नाईक (Adnya Naik) यांनी म्हटले आहे.  

Updated: Nov 14, 2020, 02:58 PM IST
किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक
दिवंगत अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता, आज्ञा नाईक (पीटीआय)

मुंबई : किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) अचानक केवढे कष्ट घेत आहेत, उलट त्यांना मदत करायला तयार आहोत, असे आज्ञा नाईक (Adnya Naik) यांनी म्हटले आहे. जमिनीचे व्यवहार (Land Deal ) आधीचे आहेत, त्यांचा आता काही संबंध नाही. आम्हाला अजूनही धमकीचे फोन येत आहेत. पाठलाग होत आहे. किरीट सोमय्यांनी उलट माणुसकीच्या नात्याने तरी आमच्याशी येऊन बोलले पाहिजे, असे आज्ञा नाईक (Adnya Naik) यांचे म्हणणे आहे.  

मी किरीट सोमय्या यांच्या नातीच्या वयाची आहे. तर माझी अक्षता नाईक ही तर त्यांच्या मुलीच्या ठिकाणी आहे. आता मला सांगा यांच्या नातीबाबत किंवा मुलीबाबत असं काही घडलं असते तर त्यांनी ही भूमिका घेतली असती का, असा थेट सवाल केला आहे. आम्हाला त्रास देण्यासाठी प्रयत्न होत आहे. मात्र, आम्ही याला लढा देणार आहोत. केवळ राजकारण करण्याचे काम सुरु आहे. माझे वडील आणि आजी गेली आहे. आम्हाला न्याय हवा आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत, असे आज्ञा नाईक म्हणाली.

अर्णब गोस्वामी हे महाराष्ट्रात येथे येईल व्यवसाय करत आहेत. त्यांच्याशी किरीट सोमय्या यांचे मित्रत्वाचे संबंध असतील. पण महाराष्ट्रातील मराठी मुलीला न्याय मिळत नाही. कोणत्या गोष्टीला कशाचाही संबंध लावला जात आहे. किरीट सोमय्या यांना आणखी काही माहिती हवी असेल तर आम्ही ती देऊ. ते कधी आमच्याशी बोलू शकतात. मात्र, त्यांनी कधी आमच्यावर काय संकट ओढवले आहे. त्यासाठी ते कधी आम्हाला भेटायला तरी आले आहेत का, असा सवाल आज्ञा नाईक हिने उपस्थित केला आहे.

दरम्यान, जेवढी थडगी उकराल, तेवढे तुमचेच सांगाडे सापडतील, असे म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना इशारा दिला आहे. तसेच सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग विरोधकांनी बंद करावेत. महाराष्ट्रात कुठलंही ऑपरेशन होणार नाही, पुढची चार वर्षं उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, असे राऊत म्हणाले. गेल्या वर्षभरात विरोधकांनी सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न केले पण सरकारला साधं खरचटलंही नाही, असं राऊत म्हणाले. तर भाजपने ठरवले तर रक्तबंबाळ करू असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. 

किरीट सोमय्यांनी खोटेनाटे आरोप करणं बंद करावे आणि जुनी थडगी उकरु काढणं थांबवावे, असे राऊत म्हणालेत. आम्ही जुनी थडकी उकरुन काढल्यास तुमच्या पापांचे सांगाडे जास्त सापडतील असा इशारा राऊतांनी सोमय्यांना दिला आहे. सोमय्यांना त्यांच्याच पक्षात गांभिर्यांन घेतलं जात नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.