मुंबई : Monsoon News : मान्सूनचा प्रवास सध्या संथ गतीने सुरु आहे. पण येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. (Maharashtra Weather) मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून आगेकूच केली. दरम्यान, उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आलाय. मॉन्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण आहे. (Rain in Maharashtra)
मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. उद्यापासून सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मान्सूनचा प्रवास सध्या संथ गतीने सुरु आहे. पण येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापला आहे. लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे. श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापून ते भारताजवळ पोहोचले आहेत. पण काल मान्सूनने कोणतीही प्रगती केलेली नाही. मात्र देशात सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. पुढील काही तासांमध्ये मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू होईल.