'राणेंच्या १० वर्षांच्या राजकारणात ९ जणांचे बळी कुणी घेतले?'

सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या १० वर्षातल्या राजकारणात ९ जणांचा बळी नेमके कुणी घेतले?

Updated: Jan 13, 2019, 06:03 PM IST
'राणेंच्या १० वर्षांच्या राजकारणात ९ जणांचे बळी कुणी घेतले?' title=

रत्नागिरी : सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या १० वर्षातल्या राजकारणात ९ जणांचा बळी नेमके कुणी घेतले?, असा सवाल करत शेलक्या शब्दात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर कठोर शब्दात टीका केली आहे. तर म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी राणेंच आव्हान स्वीकारत कणकवलीत जाऊन विजयाचे फटाके फोडू, असा निर्धार व्यक्त केला. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वाटद गटाचा मेळावा शिवसेनेनं आयोजित केलाय होता. स्वाभिमान पक्षानं याच ठिकाणी दिलेलं आव्हानं स्वीकारत असल्याच सांगत राऊत यांनी राणेंवर ही गंभीर टीका केली आहे.

नारायण राणे हे स्वत:च्या कर्माने जाणार आहेत. आमची निष्ठा पैशावर नाही आमची निष्ठा स्वार्थावर नाही. भले आम्हाला काही नाही दिलं तरी आमचं भगव्यावर असलेलं इमान, बाळासाहेबांवर असलेलं इमान हे कुठेही आम्ही विकायला ठेवलेलं नाही. ते मनामध्ये जपून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच एकवेळच्या दादरच्या फुटपाथवर कपबशी विकाणारा विनायक राऊत आज देशाच्या सर्वच्छ सभागृहात जाऊन बसतोय, असं राऊत म्हणाले. तर म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी देखील खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचे फटाके आता कणकवलीत जावूनच फोडायाचा निर्धार केला.