बीड : गंगाखेड साखर कारखान्याचे संचालक रत्नाकर गुट्टेचा आणखी एक कारनामा समोर आलीय. गुट्टेनं परभणी येथील एका शेतक-याच्या अडीच एकर जमीनीवर तब्बल 502 कोटी रुपये कर्ज उचललं आहे.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा सातबाराच विधान परिषदेत सादर केला. गुट्टेनं १५ हजार शेतक-यांच्या नावावर 328 कोटी रुपयांचं कर्ज उचलल्याप्रकरणी लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान मुंडेंनी हा प्रकार उघड केला.
गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 22 दिवस लोटले तरीही त्यांना अटक का होत नाही असा सवालही मुंडेंनी विधान परिषदेत विचारला. याप्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना गृह राज्यमंत्री दीपक केसरकर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे ही लक्षवेधी आता राखून ठेवण्यात आली आहे.
गंगाखेडबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे पुरेसी माहिती नाही असं सांगत, याप्रकरणी गृहराज्यमंत्री केसरकरांनी सभागृहात दिलगिरीही व्यक्त केली.