नागपूर : अनैतिक संबंधातून पत्नीने नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेखर पौनिकर असे मृत पतीचे नावे आहे. याप्रकरणी यशोधानगर पोलीसांनी पत्नी आणि मित्र प्रज्वल भैसारेला अटक केली आहे. चार वर्षांपूर्वीच या महिलेचे शेखर यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आणि प्रज्वलची मैत्री झाली. आणि या मैत्रीचे रूपांतर मग अनैतिक संबंधात झाले. शेखरला याचा संशय आला. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होता.
दरम्यान, हे संबंध माहिती पडल्यानंतर पती-पत्नीमध्ये वादाला अधिकच तोंड फुटले. शेखर आपल्या पत्नीला मारहाणही करत होता. आणि याचाच बदला घेण्यासाठी त्याच्या पत्नीने त्याच्या हत्येचा कट रचला आणि प्रज्वलच्या मदतीने शेखरची हत्या केली.