औरंगाबाद : येथील शासकीय घाटी रुग्णालयात आता कोरोना टेस्ट होणार आहे. येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध असणार आहे. खरंतर ही मशीन घाटी रुग्णालयाला गेल्यावर्षीच मंजूर झाली होती. मात्र निधीअभावी येऊ शकली नव्हती. आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतर हे मशीन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. पुढच्या आठवड्यात मशीन कार्यान्वित होईल आणि रिपोर्ट मिळायालाही सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घाटी रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या अनेक रुग्णांचीसुद्दा प्रचंड काळजी घेण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातही कोरोना फोफावत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना पॉझिटीव्ह असणाऱ्या एका महिलेला रुग्णालयातून अखेर सुट्टी देण्यात आली आहे. गेले दहा दिवस या महिलेवर कोरोनासाठीचे उपचार सुरु होते. ज्यानंतर आता ती महिला पूर्णपणे बरी झाली असून, तिला सोमवारी दुपारी रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी या महिलेने देवाचे आणि डॉक्टरांचेही आभार मानले. कोरोनाच्या आव्हानावर मात करुन परतणाऱ्या महिलेच्या प्रकृतीमध्ये आलेली सुधारणा ही अनेकांनाच दिलासा मिळाला आहे. आता कोरोना चाचणी होणारी मशिन येणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेत. इस्लामपुरातील तब्बल २३ जणांना कोरोनाची बाधा झाली. सौदी अरेबियातून प्रवास करुन आलेल्या कुटुंबाशी संबंधित हे रुग्ण असल्याचे सांगण्यात येते आहे. सांगलीतल्या रुग्णांची संख्या आता २३ झाली आहे. याच कुटुंबातशी संबंधित आणखी १२ जणांचे काल रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे एकाच कुटुंबातील तब्बल २३ सदस्यांना कोरोना झाल्याने सांगलीतल्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. मुंबईनंतर सांगलीत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभावही जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत उपाय योजनांसाठी, मुंबईमधून तीन डॉक्टरांची समिती सांगलीत दाखल झाली आहे. डॉ. पल्लवी साफळे यांनी मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अधिष्ठाता पदाचा घेतला चार्ज घेतला आहे. सांगलीत काल एकाच दिवसात २३ रुग्ण सापडलेत होते.