सांगलीत कोरोनाचा धोका, राज्य सरकारकडून तीन डॉक्टरांची समिती

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. 

Updated: Mar 28, 2020, 04:55 PM IST
सांगलीत कोरोनाचा धोका, राज्य सरकारकडून तीन डॉक्टरांची समिती
संग्रहित छाया

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. मुंबईनंतर सांगलीत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभावही जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत उपाय योजनांसाठी, मुंबईमधून तीन डॉक्टरांची समिती सांगलीत दाखल झाली आहे. डॉ. पल्लवी साफळे यांनी मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अधिष्ठाता पदाचा घेतला चार्ज घेतला आहे. सांगलीत काल एकाच दिवसात २३ रुग्ण सापडलेत होते.

 सांगली जिल्ह्यात कोरोनाबाबत उपाययोजनाबाबत  मुंबईमधून डॉक्टरांची समिती दाखल झाली आहे. या समितीत तीन डॉक्टरांचा समावेश आहे.  जे जे हॉस्पिटल अधिष्ठाता डॉ. पल्लवी साफळे यांचा समावेश आहे. त्या यापूर्वी मिरजेत अधिष्ठाता होत्या. तसेच डॉ. विनायक सावर्डेकर, डॉ. प्रशांत होवाळ यांचा या समितीत समावेश आहे.

सांगलीत २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?

डॉ. पल्लवी साफळे यांच्याकडे मिरजेच्या शासकीय वैदकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अधिष्ठाता (डीन) पदाचा चार्ज देण्यात आला आहे. त्यांना आता प्रशासकीय अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे सांगलीतील वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. राज्यसरकारने तात्काळ हालचाल करुन तीन डॉक्टरांची समिती सांगलीत पाठवून दिली आहे. तसेच मिरजेच्या शासकीय वैदकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील  आर्थिक अधिकार  विद्यमान अधिष्ठाता डॉ. सुधीर नंणदरकर यांच्याकडे राहणार आहेत.

आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेत. इस्लामपुरातील तब्बल २३ जणांना कोरोनाची बाधा झाली. सौदी अरेबियातून प्रवास करुन आलेल्या कुटुंबाशी संबंधित हे रुग्ण असल्याचे सांगण्यात येते आहे. सांगलीतल्या रुग्णांची संख्या आता २३ झाली आहे. याच कुटुंबातशी संबंधित आणखी १२ जणांचे काल रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे एकाच कुटुंबातील तब्बल २३ सदस्यांना कोरोना झाल्याने सांगलीतल्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.