MLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत अलर्ट जारी!

Maharastra Politics: निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांना अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. जर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा (NCP) प्रयत्न असणार आहे.

Updated: Feb 1, 2023, 08:03 PM IST
MLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत अलर्ट जारी!  title=
MLA Jitendra Awhad

MLA Jitendra Awhad: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे (Thane Political News) जिल्ह्यात शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी (Shinde vs NCP) असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे आता साम दाम दंड भेद या पर्यायाचा वापर करून एकनाथ शिंदे आमदार जिंतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई (Jitendra Awhad be arrest) केली जाईल, अशी शक्यता आहे. आव्हाडांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अटक होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या (NCP) बैठकीत वर्तविण्यात आली आहे. (Will MLA Jitendra Awhad be arrested Alert issued in NCP meeting thane marathi latest news)

ठाण्याच्या नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली?

आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षातील नगरसेवकांना फोडण्यासाठी वेगवेगळी आश्वासने शिंदे गटाकडून देण्यात येतील. मात्र या आव्हानांना नगरसेवकांनी बळी पडू नये. या निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होण्याची शक्यता आहे. जर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. प्रसंगी जितेंद्र आव्हाडांशिवाय आपल्याला ही निवडणूक पार पाडायची आहे. सध्या जितेंद्र आव्हाड यासोबतच आनंद परांजपे यांना पोलिसी कारवायात अडकवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही.

आणखी वाचा - NCP MLA in CM Shinde Car: राष्ट्रवादीच्या नाराज आमदाराचा CM शिंदेंच्या कारमधून प्रवास; चर्चांना उधाण

काय म्हणाले Jitendra Awhad?

ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे, की मला अटक केली जाऊ शकते. ठाणे महापालिका आणि त्यानंतर काही महिने मला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरला आहे. माझ्याविरुद्ध काही केसेस नाही, त्यामुळे मला आश्चर्य वाटलं, असंही आव्हाड (MLA Jitendra Awhad) म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटलांनी (Jayant Patil) स्पष्ट संकेत दिले आहेत. आव्हाडांशिवाय निवडणुकीला तयार रहा, असे संकेत पक्षश्रेष्टींनी दिले आहेत. त्यामुळे ठाण्यात आगामी काळात संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यापूर्वी बोलताना आव्हाडांनी आरोप केले आहेत.