पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार? भाजप सोबत असलेल्या नाराजीविरोधात मोठा निर्णय

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत.  मी कधी कुणा समोर झुकणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी रोखठोक भूमिका मांडली. यानंतर पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार का? अशी चर्चा रंगली आहे.   

वनिता कांबळे | Updated: Jun 3, 2023, 07:35 PM IST
पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार? भाजप सोबत असलेल्या नाराजीविरोधात मोठा निर्णय title=

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत. भाजप सोबत असलेल्या नाराजीविरोधात पंकजा मुंडे (Pankaja Munde)  मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यकर्त्यांना संबोधीत केले. मी कधी कुणा समोर झुकणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी रोखठोक भूमिका मांडली. यानंतर  पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार अशी चर्चा रंगली आहे. याला कारण ठरले आहेत ते पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते.

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सध्या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांची राजकीय कारकिर्द अडचणीत आली आहे. भाजप पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची देखील चर्चा आहे. भाजपनं पंकजा मुंडेंना कुठलीही मोठी जबाबदारी दिलेली नाही. तसेच पंकजा यांचे राजकीय पुनर्वसनही करण्यासाठी पक्षाने कोणतेही प्रयत्न देखील केलेले  नाहीत.

पंकजा मुंडे यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. गोपीनाथ गडावर मुंडेंना श्रद्धांजली अर्पण करताना पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली.   माझे नेते अमित शाह आहेत. लवकरच मी अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. जेव्हा भूमिका घ्यायची असेल तेव्हा सगळ्यांना बोलावून सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार, अस पंकजा मुंडे म्हणाल्या.

स्वतःचा पक्ष काढा; कार्यकर्त्यांची मागणी

गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांचे भाषण सुरु असताना एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे स्वत:चा पक्ष काढा अशी मागणी केली.  आम्ही तन मन लावून पक्षासाठी काम करु. गरज पडल्यास स्वत:चे रक्त देऊ असे देखील हा कार्यकर्ता म्हणाले. 

पंकजा मुंडें यांना काँग्रेसची ऑफर 

पंकजा मुंडें  राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच आता त्यांना काँग्रेस पक्षाची ऑफर आली आहे. पंकजा मुंडेंसाठी काँग्रेसचे दरवाजे सदैवं खुले आहेत असं विधान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. पंकजा मुंडेंवर भाजपात अन्याय होत आहे. त्यामुळेच नैराश्यातून त्यांनी 'ते' विधान केलं असावं असंही थोरात यांनी म्हंटले. गोपीनाथ मुंडेंचं पक्षात मोठं योगदान असतानाही त्यांच्यावर अन्याय केला गेला असंही थोरात म्हणाले आहेत.