अण्णा हजारेंचा पुन्हा सरकार विरोधात एल्गार, दिल्लीत जनलोकपाल आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे जनलोकपाल आणि शेतक-यांच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या २३ मार्चपासून ते दिल्लीत आंदोलन करणार आहेत. २३ मार्च हा ‘शहीद दिवस’ आहे म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली आहे.

Updated: Nov 29, 2017, 03:51 PM IST
अण्णा हजारेंचा पुन्हा सरकार विरोधात एल्गार, दिल्लीत जनलोकपाल आंदोलन title=

मुंबई : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे जनलोकपाल आणि शेतक-यांच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या २३ मार्चपासून ते दिल्लीत आंदोलन करणार आहेत. २३ मार्च हा ‘शहीद दिवस’ आहे म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडून पत्रांना उत्तर नाही

राळेगणसिद्धी येथील एका बैठकीत बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, जनलोकपाल, शेतक-यांच्या समस्या आणि निवडणुकीत सुधारणांसाठी हा सत्याग्रह असेल. या मुद्द्यांवर मी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधानांना पत्र लिहित आहे. पण त्यावर काहीही उत्तर मिळाले नाहीये’.

कोणत्या उद्योगपतीने आत्महत्या केली? 

ते म्हणाले की, ‘गेल्या २२ वर्षात कमीत कमी १२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की, या कालखंडात कोणत्या उद्योगपतीने आत्महत्या केली. जनलोकपाल समिती गठनाबद्दल ते म्हणाले की, लोकसभेत सध्या विरोध पक्षाचा कोणताही नेता नाहीये. त्यामुळेच समिती गठन होऊ शकत नाहीये. त्यामुळेच लोकपालांचा नियुक्तीही होत नाहीये.

जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी २०११ मद्ये १२ दिवसाचं उपोषण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडलं होतं यासाठी त्यांना संपूर्ण देशातून समर्थन मिळालं होतं. ते म्हणाले की, ‘सरकारकडून जनलोकपाल कायद्याबाबत जी कारणे दिली आहेत ती तांत्रिक आहेत’.