मुंबई : राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. मुंबईत जरी जापमान जास्त असलं तरीही उत्तर महाराष्ट्रात मात्र चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. निफाड आणि अहमदगरमध्ये वातावरणात सुरेख असा गारवा जाणवत आहे.
मंगळवारी सकाळी निफाडमध्ये तापमानाचा पारा १०.६ अंशांपर्यंत खाली गेला होता. येत्या काही दिवसांणध्ये तापमान आणखी खाली जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये नाशिकच्या निफाड येथे तापमानाचा निच्चांक पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पारा हा १२ अंश सेल्शिअसवर होता. जो आणखी खाली जाताना दिसत आहे.
सकाळी फेरी मारण्यासाठी निघणाऱ्यांची गर्दी नाशिकमध्ये वाढली आहे. तापमानात झालेला हा बदल पाहता स्थानिकांमध्येही एक प्रकारचा आनंद पाहायला मिळत आहे.
उत्तर भारतातही बऱ्याच भागांमध्ये होणारी बर्फवृष्टी आणि तापमानातील बदल पाहता पुढील काही दिवस वातावरणाचं हे सुरेख रुप अनुभवता येईल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
दरम्यान, संपूर्ण राज्याच गुलाबी थंडीचा बहर येण्यास सुरुवात झालेली असताना मुंबईकरांपर्यंत हे थंड वारे कधी पोहोचणार याचीही वाट अनेकजण पाहात आहेत, असं म्हणायला हरकत नाही.