लाडकं माजंर मेल म्हणून महिलेने चौघांसोबत डॉक्टरला बदडले; पुण्यातील धक्कादायक घटना

संबधित महिला पुण्यातील एका पाळीव प्राण्यांवर उपचार करणार्‍या रुग्णालयात आपल्या मांजराला उपचारासाठी घेऊन आली होती. उपचारादरम्यान तिच्या मांजराचा मृत्यू झाला. मांजराचा मृत्यू झाल्याने या महिलेसह चार अनोळखी व्यक्तींनी डॉक्टरांना मारहाण करत क्लिनिकची तोडफोड केली.

Updated: Dec 12, 2022, 04:43 PM IST
लाडकं माजंर मेल म्हणून महिलेने चौघांसोबत डॉक्टरला बदडले; पुण्यातील धक्कादायक घटना title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : लाडकं माजंर मेल(cat dies) म्हणून महिलेने चौघांना सोबत घेऊन डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे.  पुण्यात(Pune) ही धक्कादायक घटना घडली आहे. यात डॉक्टर गंभीर जखमी झाला आहे. मारहाणीचा हा सर्व थरार रुग्णालायातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  संबधित महिला पुण्यातील एका पाळीव प्राण्यांवर उपचार करणार्‍या रुग्णालयात आपल्या मांजराला उपचारासाठी घेऊन आली होती. उपचारादरम्यान तिच्या मांजराचा मृत्यू झाला. मांजराचा मृत्यू झाल्याने या महिलेसह चार अनोळखी व्यक्तींनी डॉक्टरांना मारहाण करत क्लिनिकची तोडफोड केली.

हडपसर येथील भाजी मंडई जवळील डॉग अ‍ॅण्ड कॅट क्लिनिकमध्ये हा धक्कादायक प्रकार  घडला आहे. याप्रकरणी डॉ.रामनाथ येण्याबापु ढगे (वय-51,रा.हडपसर,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एक महिला आणि चार अनोळखी इसम यांचे विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. तक्रारदार यांचे हडपसर भागातील डॉग अ‍ॅण्ड कॅट क्लिनिक येथे क्लिनीक आहे. आरोपींनी उपचारसाठी आणलेल्या मांजराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपींनी डॉक्टरांना शिवीगाळ करुन मांजर कसे झोपले आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 

या मारहाणीत डॉक्टरांचा पाय फ्रॅक्चर झाला. तसेच डॉक्टरांच्या क्लिनिकमधील वस्तूंची  तोडफोड करुन आरोपी पसार झाले. या घटनेचे चित्रिकरण क्लिनिकमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून त्याआधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.