मेट्रोतील 'त्या' व्हायरल व्हिडीओनंतर महिलांचे 'सेलिब्रेशन ऑन व्हील'

 मेट्रोमध्ये अश्लील डान्स आणि जुगार अड्डा रंगवत कलंकित केलं होतं.

Updated: Jan 24, 2021, 03:48 PM IST
मेट्रोतील 'त्या' व्हायरल व्हिडीओनंतर महिलांचे 'सेलिब्रेशन ऑन व्हील'

ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर : नागपूर मेट्रोमध्ये काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्यानं सहकाऱ्यांसह नागपूर मेट्रोमध्ये अश्लील डान्स आणि जुगार अड्डा रंगवत कलंकित केलं होतं. त्यानंतर नागपुरकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट होती. मात्र त्यानंतर नागपूर मेट्रोमध्येच पारंपारिक पद्धतीन महिलांनी हळदीकुंकाचा आगळावेगळा कार्यक्रम नियमात साजरा करत एक शिस्तीचं आणि परंपरेला धरून चांगल उदाहरण ठेवलं.

नागपूरच्या मेट्रोमध्ये शनिवारी संध्याकळी एक आगळा वेगळा हळदीकुंकू कार्यक्रम रंगला. धावत्या मेट्रोमध्ये  पारंपारिक पद्धतीन वेशभूषा परिधान करत मेट्रोनं सेलिब्रेशन ऑन व्हील या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी हळदीकुकुं स्पेशल राईड झाली. धावत्या मेट्रोतंच ऐकमेकिंना कुंक लावत. वाण देत आनंदाची उधळण करत  धावत्या मेट्रोमध्ये महिलांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा केला.

जिल्हा परिषद शिक्षिका वर्गानी मकर संक्रातिच्या निमित्याने हा हळदी कुंकूचा राईड होती.मेट्रोतील या आगळ्यावेगळ्या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्तान हळदी कुंकूं सोबतच आपापसात भरपूर गप्पा मारत मेट्रो राईडच्या संधी महिलांनी पुरेपूर एन्जॉय केलीय. आजचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय राहील असे मत अनेकींनी व्यक्त केलं.

मेट्रो प्रवासी संख्या वाढविण्यासाठी असे उपक्रम मेट्रो किती दिवस करणार असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान एका स्थानिक राजकिय नेत्यानं मेट्रोला कलंकित करण्याचा केलेल्या प्रयत्नानंतर महिलांनी पारंपारिक पद्धतीनं आणि शिस्तीत केलेली ही हळदीकुकू मेट्रो राईड चर्चेत आलीय.