उचंगी धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी पाडले बंद

 उचंगी प्रकल्पग्रस्त (Uchangi dam project victims) आक्रमक झाले आहेत. उचंगी धरणाचे (Uchangi dam ) काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले. 

Updated: Dec 25, 2020, 01:48 PM IST
उचंगी धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी पाडले बंद  title=

प्रताप नाईक / कोल्हापूर : येथील उचंगी प्रकल्पग्रस्त (Uchangi dam project victims) आक्रमक झाले आहेत. उचंगी धरणाचे (Uchangi dam ) काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले. आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे गेली २२ वर्षे संकलन दुरुस्तीचे काम झालेले नाही. त्यामुळे धरणग्रस्त आक्रमक झालेत. ज्या ठिकाणी धरण प्रकल्प ( dam project) सुरु आहे तिथे धाव घेत सुरु असलेले काम बंद पडले.

उचंगी धरणाचे काम २०००पासून सुरू आहे. सध्या धरणाचे ८०टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २०टक्के काम पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन पातळीवर सुरू आहे. मात्र, दुसरीकडे धरणासाठी आपल्या जमिनी दिलेल्या धरणग्रस्ताचे काम अद्याप प्रलंबित आहे. 

हे काम मार्गी लागावे म्हणून प्रकल्पग्रस्त अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. असे असताना प्रशासनाच्या पातळीवर धरणग्रस्ताचे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीत, असा आरोप प्रकल्पग्रस्थांनी केला आहे. त्यामुळेच ज्या ज्या वेळी धरणाचे काम सुरू केले जाते, त्या त्या वेळी धरणग्रस्त आक्रमक होत आहे. त्यांनी धरणाचे सुरू असलेल काम बंद पडले आहे. त्याचबरोबर संकलन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याशिवाय धरणाचे उर्वरीत काम करू देणार नाही, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.