औरंगाबाद : अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस यांनी जगप्रसिद्ध अजिंठा-वेरुळला भेट दिली. दोन दिवसांपूर्वीच जगातील श्रीमंतांची यादी प्रसिद्ध झाली. या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी हे १५ व्या स्थानावर आहेत. मात्र, जेफ बेजोस हे पहिल्या क्रमांकावर आहेत. बेजोस हे औरंगाबादमधील एलोरामध्ये आले आहेत. बेजोस त्यांच्या खासगी विमानाने आलेत. बेजोस पत्नी आणि मुलांसह अजिंठा आणि एलोरामधील लेण्या पाहिल्या. यानंतर ते वाराणसीला जाणार आहेत.
अॅमझॉनचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या बेजोस यांच्या संपत्तीचे एकूण मूल्य १४१.९ अब्ज डॉलर इतके आहे. सोमवारीच फोर्ब्सनं जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली. यामध्ये बेजोस यांना पहिले स्थान पटकावले आहे. जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन संकेतस्थळाचे संस्थापक असलेल्या जेफ बेजोस यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.
१ जूनपासून बेजोस यांच्या संपत्तीत ५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची एकूण ९२.९ अब्ज डॉलर इतकी आहे. तर वॉरन बफेट यांच्या संपत्तीचं मूल्य ८२.२ अब्ज डॉलर आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत बेजोस यांची अॅमेझॉन जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या उत्पन्नाच्या बाबतीत केवळ अॅपल कंपनी अॅमेझॉनच्या पुढे आहे.