मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे आणखी एक नवा रुग्ण यवतमाळमध्ये आढळून आला आहे. यवतमाळमधील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर राज्यात एकूण ३८ रुग्ण झाले आहेत. मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक अशा चार रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता अमरावतीमधील रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले.
#BreakingNews । राज्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला । कोरोनाचा संख्या ३८ वर पोहोचली । यवतमाळमध्ये एक रुग्ण आढळला । हा रुग्ण दुबईत गेला होता । त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला#Mumbai #Maharashtra #CoronavirusOutbreak #Coronavid19 #coronavirus @CMOMaharashtra @ashish_jadhao pic.twitter.com/IHKEiIYuSF
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 16, 2020
आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आलेल्या संशयिताचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यवतमाळमध्ये रुग्णांची संख्या तीन झाली आहे. दुबईहून आलेल्या नऊ संशयित रुग्णा पैकी हे तीन रुग्ण आहेत. या आधी दोन जण पॉझिटीव्ह तर आज एक पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. तर जालन्यात कोरोनाचा दुसरा संशयित रुग्ण आढळला आहे.
Yavatmal District Collector MD Singh: One more person, with travel history to Dubai, has been tested positive for #coronavirus. With this, total number of COVID-19 cases rises to 38 in #Maharashtra. https://t.co/1zaQS6ixHN pic.twitter.com/7m1JdKEg6d
— ANI (@ANI) March 16, 2020
जालना घाटी रुग्णालयात आयसोलेशन वार्डात प्राथमिक उपचार सुरू आहेत. गोव्यामध्ये फिरायला गेला असता परदेशी लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवणार येणार आहेत. संशयित कोरोना रुग्ण हा जालन्याचा रहिवासी आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक एस.पी. कुळकर्णी यांनी माहिती दिली.
मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक अशा चार रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईतल्या रुग्णांची आठ तर नवी मुंबईत आता दोन रुग्ण झाले आहेत.