नागपुरातील रामनगर चौकात तरूणाची भरदिवसा हत्या

शहरातील कुठ्ल्या तरी भागात रोज  हत्या आणि दरोड्या सारख्या गंभीर घटना घडत आहेत... त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याबद्दल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Updated: May 4, 2018, 12:33 PM IST
नागपुरातील रामनगर चौकात तरूणाची भरदिवसा हत्या title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : एकाच वेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा कारभार पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील गुन्हेगारी अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. नागपूरच्या रामनगर चौक परिसरात दिवसाढवळ्या एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. राजेश यादव असं मृत नाव आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास रामनगर चौकात राजेशचा फेरीवाल्याबरोबर काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात फेरीवाल्यानं राजेशवर धारदार शस्त्रानं वार करून पळ काढल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणनं आहे. दरम्यान फेरीवाल्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

कासा घटला प्रकार? 

नागपुरात पुन्हा एकदा भर रस्त्यावर हत्येची घटना घडली... अत्यंत वर्दळीच्या रामनगर चौकाजवळ कर्नाटक संघ समोर गुरूवारी दुपारी राजेश उर्फ रज्जू यादव या ३३ वर्षीय इसमाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली... दुपारी साडे तीन ते चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे... घटनेच्या वेळी मृतक रज्जू यादव उसाच्या रसाच्या ठेल्याजवळ बसलेला होता... प्रत्यक्षदर्शींच्या मते त्याचे फेरीवाल्यासोबत काही वाद झाले... आणि त्यानंतर ही घटना घडली...

हत्या करून मारेकरी फरार..

दरम्यान घटनेनंतर फेरीवाला आणि इतर लोक घटनास्थळावरून फरार झाले आहे... पोलीस त्यांचा शोध घेत आहेत... पैशाच्या वादातून ही हत्या झाली असावी असे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे...  रोज शहरातील कुठ्ल्या तरी भागात हत्या आणि दरोड्या सारख्या गंभीर घटना घडत आहेत... त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याबद्दल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.