close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अकोल्याच्या जैन गेस्ट हाऊसमध्ये युवकाची आत्महत्या

संजय रघुनाथ वानखडे असे गळफास घेतलेल्या युवकाच नाव आहे. 

Updated: Jul 25, 2019, 08:25 PM IST
अकोल्याच्या जैन गेस्ट हाऊसमध्ये युवकाची आत्महत्या

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : नाशिक येथील युवकाने अकोला शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जैन गेस्ट हाऊसमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय रघुनाथ वानखडे असे गळफास घेतलेल्या युवकाच नाव आहे. तो नाशिक शहरातील सातपूर गावातील वास्तव्यास होता.

मृत संजय वानखडे २४ जुलै रोजी पहाटे साडे तीनच्या सुमरास अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचला. त्यानंतर त्याने जवळच असलेल्या जैन गेस्ट हाऊसमध्ये भाड्याने खोली घेतली होती.  

दरम्यान, वानखडे हे गेल्या २४ तासापासून खोली बाहेर न आल्याने हॉटेल मालकाने खिडकीमधून आत बघितले असता वानखडे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अद्यापही या आत्महत्ये मागचे कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.