ZEENIA AI Survey: मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनिया महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. यानिमित्ताने वेगळेपणाचा ध्यास असलेल्या झी 24 तासने पुन्हा इतिहास रचला आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून हा AI सर्व्हे झी 24 तासवर पाहाता येणार आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे. राज्य सरकारचं काम लोकांना कसं वाटलं? असे प्रश्न आम्ही मतदारांना विचारले. यात मतदारांनी दिलेल्या उत्तराची टक्केवारी काढण्यात आली आहे.
शिंदे फडणवीस-अजित पवार सरकारचं कामकाज कसं वाटलं हा प्रश्न आम्ही 288 मतदार संघातील मतदारांना विचारला. यावर नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. सध्याच्या महाराष्ट्र सरकार म्हणजेच शिंदे फडणवीस-अजित पवार सरकारचं काम लोकांना कसं वाटलं हा प्रश्न विचारल्यावर लोकांनी कोणाच्या बाजुने कौल दिला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. शिंदे फडणवीस-अजित पवार सरकारचं कामकाज चांगलं वाटलं असं उत्तर 40 टक्के जणांनी दिलंय. 25 टक्के मतदारांना ही कामगिरी समाधानकारक वाटली. 20 टक्के जणांना या सरकारची कामगिरी वाईट आहे, असे वाटले. तर 15 टक्के जणांनी महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर काही सांगता येणार नाही, असे उत्तर दिले.
बेरोजगारीला आळा घालण्याबाबत सरकारचं काम कसं वाटलं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर 35 टक्के जणांनी चांगल वाटलं असं उत्तर दिलं. 30 टक्के जणांना हे काम समाधानकारक वाटलं. 25 टक्के जणांना सरकारचं हे काम वाईट वाटलं. तर 10 टक्के जणांनी यावर सांगता येत नाही, असं उत्तर दिलं.
सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेलं काम कसं वाटलं? असा प्रश्न महाराष्ट्रातील मतदारांना विचारण्यात आला.40 टक्के जणांना सरकारचं काम चांगल वाटल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. तर समाधानकारक काम वाटल्याची प्रतिक्रिया 30 टक्के जणांनी दिली. 20 टक्के जणांना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेलं काम वाईट आहे असं वाटलं. तर 10 टक्के जणांनी यावर सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक दोन महिन्यांवर आली असताना झी 24 तासनं विधानसभेचा सर्वात मोठा AI सर्व्हे केला आहे. पहिली मराठी AI अँकर ZEENIA हा सर्व्हे जाहीर करणार आहे. या सर्व्हेत आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला आहे. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व्हे तयार केला आहे. राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे. यांचा अंदाज घेण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर- वरील माहिती ही 'झी 24 तास'ने महाराष्ट्राच्या 288 मतदार संघात जाऊन केलेलं सर्व्हेक्षण आहे. हा कोणत्याही प्रकारचा निकाल नसून जनमताचा कौल आहे.)