Amjad khan : चारशे रूपयांसाठी 'गब्बर' फेम अमजद खान झाला होता हतबलं

शादाब खानचा ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशी अमजद खान यांनी शोले चित्रपट साईन केला होता.

Updated: May 9, 2022, 04:18 PM IST
Amjad khan : चारशे रूपयांसाठी 'गब्बर' फेम अमजद खान झाला होता हतबलं title=

मुंबई : भारतीय सिनेमात शोले चित्रपट खूप गाजला. याच सिनेमाने अमजद खान या अभिनेत्याला मोठे केले. आजही त्यांच्या या अभिनयाचे कौतूक होते. अमजद खान (Amjad khan) यांनी शोले चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले. मात्र एक वेळ अमजद खान (Amjad khan) यांच्या आयुष्यात अशी आली, ज्यावेळेस त्यांना 400 रूपयांसाठी झगडावे लागले होते. अमजदला (Amjad khan) आपल्या बायकोचा रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यासाठी 400 रूपयांची गरज होती. मात्र त्यांच्याजवळ तितके पैसे नव्हते. अमजद खान (Amjad khan) यांचा मुलगा शादाब खान यांनी हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला.  
  
शोले हा सिनेमा 1975 साली रीलीज झाला होता. मात्र आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटात अमजद खान (Amjad khan) यांनी गब्बर नावाच्या डाकूची भूमिका केली होती. अमजद सोबत अमिताभ बच्चन, धर्मेंद्र सिंह, संजीव कूमार, हेमा मालिनी आणि जया बच्चन असे आघाडीचे कलाकार होते. या सिनेमाने यशाची मोठी उंची गाठली. 

अमजद खान यांचा मूलगा शादाब खान याने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनेक किस्से सांगितले. शादाब खानचा ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशी अमजद खान यांनी शोले चित्रपट साईन केला होता. त्यामुळे शादाब वडिलांचा लकीचार्म होता का ? असा प्रश्न विचारण्यात आलेला.  

मुलाखतीच्या उत्तरात शादाब म्हणाला, आमच्याजवळ पेमेंट करायला देखील पैसे नव्हते. ज्या रूग्णालयात माझा जन्म झाला होता.त्या रूग्णालयातून मला आणि माझ्या आईला रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यासाठी देखील पैसे नव्हते. आई या घटनेने रडायला लागली होती. माझे वडील रूग्णालयात येत नव्हते त्यांना त्यांचा चेहरा दाखवायला लाज वाटत होती.

चेतन आनंद यांनी त्यांना एका कोपऱ्यात डोकं धरून बसलेलं पाहिलं.त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांची फिल्म 'हिंदुस्तान की कसम' केली होती.  चेतन आनंद यांनी 400 रूपये दिले म्हणून मला आणि माझ्या आईला रूग्णालयातून डिस्चार्ज दिला गेल्याची कटू आठवण त्याने सांगितली.