'सूर्यवंशम'मधील हिरा ठाकूरच्या बसला ५ वर्षाचे परमिट

सेट मॅक्स वर आता आयपीएल दिसणार नसल्याने  सूर्यवंशम पाहावाच लागणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 4, 2017, 07:30 PM IST
 'सूर्यवंशम'मधील हिरा ठाकूरच्या बसला ५ वर्षाचे परमिट  title=

नवी दिल्ली: सेट मॅक्सवर लागणाऱ्या सूर्यवंशम सिनेमासोबत प्रेक्षकांचे अतूट नाते निर्माण झाले आहे असे मजेत म्हटले जाते. सूर्यवंशममधील हिरा ठाकूर, राधा, गौरी आणि मेजर रंजीत लोकांच्या तोंडात रुळले आहेत. या फिल्ममधील कोणताही डायलॉग प्रेक्षकांना सहज आठवू लागले आहेत. या सिनेमाला कोणी विसरायला गेलं की लगेचच सेट मॅक्सवर तो सिनेमा पाहायला मिळतो. त्यामुळे हा सिनेमा लागल्यावर सोशल मीडियावर केवळ सिनेमाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते.  

 आयपीएलच्या काळात यापासून सुटका मिळते अस म्हटल जायचं. काही नेटकऱ्यांनी तर यासाठी आयपीएलचे आभारही मानले. पण आता या सर्वांच्या लाडक्या सूर्यवंशमला सलग पाच वर्ष तरी पहावे लागणार आहे.

 

कारण आता सेट मॅक्स वर आता आयपीएल दिसणार नाही. मग तुम्हाला आता सूर्यवंशम पाहिल्याशिवाय पर्याय उरणार नाहीए. या विषयाला धरुन ट्वीटरवर असंख्यजण व्यक्त झाले आहेत. 

स्टार इंडियाने क्रिकेट प्रसारणात आपले वर्चस्व कायम राखत आयपीएलचे पुढच्या पाच वर्ष प्रसारणाचे अधिका १६,३४७ कोटी रुपयांना विकत घेतले. बीसीसीआयला आयपीएल मॅचसाठी ५५ कोटी मिळणार आहेत तर आंतरराष्ट्रीय मॅचच्या प्रक्षेपणासाठी ४३ कोटी मिळणार आहेत. 

का दिसतो नेहमी सूर्यवंशम ?

सूर्यवंशम दाखवण्याचे अधिकार सोनी मॅक्सने नऊ वर्षांसाठी विकत घेतल्याचे बोलले जाते. आणि हेच सूर्यवंशम दिसण्यामागचे एकमेव कारण असल्याचे म्हटले जाते.

 अजून एक कारण असण्याची ही शक्यता सोशल मीडियावर वर्तविली जाते. हा सिनेमा १९९९ साली रिलिज झाला आहे. आणि याच वर्षी मॅक्स चॅनल देखील लाँच केला होता. तसेच दोन्ही गोष्टी एकाच वेळेत आल्यामुळे त्यांच एक वेगळं कनेक्शन असल्याची चर्चाही रंगली आहे. 

२१ मे १९९९ मध्ये हा सिनेमा रिलिज झाला होता. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि साऊथची अभिनेत्री सौंदर्याने अभिनय केला आहे. सिनेमामध्ये अमिताभ बच्चन डबल रोल या सिनेमात दाखवला आहे. हिरा आणि त्याच्या वडिलांची भूमिका लोकप्रिय झाली.